अहमदनगर बातम्या

कर्जबाजारीपणास कंटाळून सुशिक्षीत युवकाची गळफास घेवून आत्महत्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सध्या अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरी मिळाली नाही, म्हणून शेती करतात मात्र शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल असे उत्पन्न मिळत नाही, यामुळे कर्जबाजारी वाढत जातो त्यामुळे अनेक तरुण निराशेच्या गर्तेत आहेत, यातच ते आपली जीवनयात्रा संपवत आहेत.

अशीच घटना जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे घडली आहे. येथील बेरोजगार युवकाची व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली. वैभव मारुती गायकवाड (वय २३) असे या तरूणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वैभव हा कुटुंबातील कर्ता मुलगा होता. आई-वडील एक भाऊ, बहीण व आजीच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्याच्यावरच होती. घरी पाच एकर जमीन आहे, निसर्गाच्या लहरीपणामुळे पुरेशे उत्पन्न मिळत नाही.

जमिनीवर कर्जही होते सध्या मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहे तरीही आरक्षण नाही. यामुळे नोकरी नाही यातच अनेक तरुणांवर कर्ज आहेत. त्यामुळे एकीकडे कर्जाचा डोंगर तर दुसरीकडे बेरोजगारीमुळे तरूण दुहेरी संकटात सापडले आहेत. रविवारी सकाळी वैभव आपल्या रूममध्ये गेला आणि नैराश्यामुळे घर बंद करून घरात गळफास घेतला.

यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबतमाहिती मिळताच खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश जानकर घटनास्थळी दाखल झाल. मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठविला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन केले व रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात जातेगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office