अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मध्ये वाढ होत आहे. तसेच यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. तसेच जिल्ह्यात दरदिवशी घडणाऱ्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होऊ लागले आहे.
कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथे घरामध्ये एकटी असलेल्या महिलेला दहा महिला व पुरुष यांनी घरात घुसून मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. तसेच घरातील शोकेश, भांडी, पलंग कपाट अशा १५ हजार किमतीच्या वस्तू चोरून नेल्या.
याप्रकरणी बेबी करीम शेख रा. डाऊच खुर्द कोपरगाव यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून सचिन दिलीप दोडकर, अमिना सलीम शेख, सौरभ विकी रोजरियो, उमेश विनोद तायडे, बाबू दत्तू पवार असेच तीन अनोळखी महिला सर्व रा, कालिकानगर शिर्डी ता. राहता या दहा जणांवर कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सचिन दिलीप दोडकर, अमिना सलीम शेख, सौरभ विकी रोजरियो, उमेश विनोद तायडे, बाबू दत्तू पवार या पाचही आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved