अहमदनगर बातम्या

६२ हजार रुपयांची लाच घेताना महिला अभियंत्यास रंगेहाथ पकडले

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : तक्रारदार यांच्या कार्यक्षेत्रातील पूर्ण झालेल्या कामाचे देयक अदा केल्याच्या बदल्यात ६२ हजारांची लाच स्वीकारताना श्रीमती रुबिया मोहम्मद हनिफ शेख, (वय ३५), सहाय्यक अभियंता, वर्ग १ यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

याप्रकरणी श्रीम. रुबिया मोहम्मद हनिफ शेख व श्रीमती रजनी पाटील, कार्यकारी अभियंता, वर्ग १, पाटबंधारे संशोधन विभाग, दिंडोरी रोड, नाशिक यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याबाबतची माहिती अशी की, तक्रारदार यांच्या कार्यक्षेत्रातील उंबरे, ता. राहुरी येथील पूर्ण झालेल्या कामाचे देयक ७,७५,९६३ रु. सदर कामाच्या अदा केलेल्या बिलातील आलोसे क्र.१ श्रीमती शेख यांनी स्वतः साठी ८ टक्क्यांप्रमाणे व आलोसे क्र. २ यांच्याकरिता १० टक्क्यांप्रमाणे, असे एकूण १८ टक्क्यांप्रमाणे १ लाख, ३९ हजार, ५०० रुपये लाचेची मागणी करत असल्याबाबतची तक्रार ला. प्र.वि. अहमदनगरकडे आज (दि. १८/४/ २०२४ रोजी प्राप्त झाली होती.

त्यानुसार आज दिनांक १८/४/२०२४ रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली असता, सदर लाच मागणी पडताळणी दरम्यान आलोसे क्र.१ श्रीम. रुबिया शेख यांनी तक्रारदाराकडे सदर कामाच्या अदा केलेल्या बिलाच्या रकमेचे स्वतःसाठी ८ टक्क्यांप्रमाणे व आलोसे क्र.२ श्रीम. पाटील यांच्याकरिता १० टक्क्यांप्रमाणे, असे एकूण १८ टक्के लाचेची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार आज दिनांक १८/४/२०२४ रोजी आलोसे क्र.१ श्रीम. रुबिया शेख यांच्याविरुद्ध सापळा रचण्यात आला. सदर कारवाईमध्ये आलोसे क्र.१ रुबिया शेख यांनी १८ टक्क्यांच्या पहिला हप्ता म्हणून ६२ हजार रुपये पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून स्वीकारले, त्यावेळी त्यांना लाच रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तसेच सदर लाच रक्कम स्वीकारण्यास आलोसे क्र.२ श्रीम. रजनी पाटील यांनी दुजोरा दिला म्हणून आलोसे क्र.१ श्रीम. रुबिया शेख व आलोसे क्र.२ रजनी पाटील यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीम. शर्मिष्ठा घारगे वालावलकर ला.प्र. वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, यांच्या मार्गदर्शनाखली पोलीस उप अधीक्षक, प्रवीण लोखंडे, पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, किशोर लाड, महिला पोलीस अंमलदार राधा खेमनर, सना सय्यद, चालक पोलीस अंमलदार हरून शेख यांनी केली.

Ahmednagarlive24 Office