अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar Crime :- एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे तब्बल दोन लाख १३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या एका महिलेस तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे.सुमित्रा रमेश छेन्दी (रा.चिचोंडी पाटील ता.नगर) असे या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी या महिलेस अटक करून कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने तिला एक दिवसाची पोलिस कोडठी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिप्ती भास्कर लांडे (रा. फ्लॅट नं ३ गुरु रेसीडेन्सी, पद्मानगर कॉर्नर पाईपलाईन रोड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती.
त्यानुसार फिर्यादी व त्यांच्या जाऊबाई या दोघीजणी शिर्डी – दौंड (बस नं.एम.एच.४० एन.९ ४०५) या बसने अहमदनगरकडे येत होत्या.
यावेळी त्यांच्याकडील सर्व दागिने त्यांनी एका स्टीलच्या डब्यामध्ये काढून तो डब्बा काळया रंगाच्या बॅगेत ठेवला होता व ती बॅग त्यांनी समोरच्या सिटाच्या खाली ठेवलेली होती.
यावेळी त्यांच्या शेजारी ३ महिला बसलेल्या होत्या त्यांच्या सोबत दोन छोटे मुले होते. सदरच्या महिला सहयाद्री चौक येथे उतरल्या. त्यानंतर आम्ही सावेडी नाका येथे बस मधुन उतरताना बसच्या महिला वाहक गायकवाड यांनी आम्हाला तुमची बॅग पाहुन घ्या, असे सांगितल्यानंतर बॅगमध्ये सोन्याचे दागिने ठेवलेला स्टिलचा डब्बा पाहिला असता तो मिळुन आला नाही.
मात्र तोपर्यत बस पुढे निघून गेली होती. नंतर आम्ही बसच्या मागे माळीवाडा बसस्थानकात गेलो. तेथे बसमध्ये सोन्याचे दागिने ठेवलेल्या डब्याचा शोध घेतला परंतु मिळुन आला नाही.
त्यामुळे शेजारी बसलेल्या त्या तीन महिलांनी सोन्याचे दागिने ठेवलेला स्टिलचा डब्बा चोरुन नेल्याची फिर्याद तोफखाना पोलिसांत दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिस उपनिरीक्षक शुभांगी मोरे यांच्याकडे तपास दिला.
मोरे यांनी पोकॉ.दत्तात्रय जपे, पोना शैलेश गोमसाळे, पोकॉ सतीश त्रिभुवन यांनी तीन महिला पैकी संशयित महिला सुमित्रा रमेश छेन्दी हीला ताब्यात घेवून चौकशी केली असता याच महिलेने दागिने चोरल्याचे निष्पन्न झाले. नंतर तिला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.