अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- महिला अत्याचाराच्या घटनांवरून संपूर्ण देशात सध्या संतापाचे वातावरण असताना जिल्ह्यात महिलांच्या छेड छाडीच्या घटना घडत आहे.
अकोले तालुक्यातील केळी रुम्हणवाडी परिसरात राहणारी एक ४५ वर्षीय महिला व तिचे नातेवाईक, पती हे शेतजमीन नांगरणयासाठी गेले असता तेथे चौघा जणांनी येऊन ही शेतजमीन आमची आहे.
तुमचा येथे काही संबंध नाही असे म्हणत पती व महिलेला मारहाण केली. त्याचबरोबर शेतकरी महिलेला खाली पाडून धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला.
याप्रकरणी पिडीत महिलेने अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून मधुकर निवृत्ती बिन्नर, संदीप मधुकर बिन्नर अनिल मधुकर बिन्नर,
मारुती निवृत्ती बिन्नर रा. सर्व केळी रुम्हणवाडी यांच्या विरोधात अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल भोसले करीत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved