अहमदनगर बातम्या

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : तालुक्यातील वडाळा महादेव येथील मच्छिंद्र विठ्ठल गांगुर्डे (वय ३८) यांनी राहात्या घरापासून काही अंतरावर गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गांगुर्डे रात्री २ वाजता घराबाहेर पडले व परिसरातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. सकाळी मुलगा विशाल हा ५ वाजता उठला व वडिलांची शोधाशोध करत असताना त्याला समोरील झाडाला वडिलांचा मृतदेह लटकत असताना आढळून आला. यावेळी विशाल याने प्रसंगावधान राखत घटनेची माहिती आजोबा व आईसह घरातील इतरांना दिली.

त्यानंतर कुटुंबियांनी घटनास्थळाकडे धाव घेत सदरचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह खाली घेत वैद्यकिय उपचारासाठी येथील साखर कामगार रूग्णालयात हलवला. प्राथमिक तपासणी करत वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सदरचा इसम मृत झाल्याचे घोषित केले.

रुग्णालयात उपस्थित नातेवाईक, ग्रामस्थांनी घटनेची माहिती येथील शहर पोलीस ठाण्यात कळविली. त्यावरून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किरण टेकाळे, पोलीस शिपाई कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

तसेच शवविच्छेदन करून सदरचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करून वडाळा महादेव परिसरात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शहर पोलीस पथक करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office