अहमदनगर बातम्या

नगरच्या तरूणीवर अत्याचार करणारा तरूण मुंबईत पकडला

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  नगर शहरात राहणार्‍या तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार करणार्‍या मुंबईच्या तरूणाला भिंगार कॅम्प पोलिसांनी वडाळा पूर्व (मुंबई) येथून अटक केली.

राहील मोबीन अन्सारी (रा. म्हाडा कॉलनी, भक्ती पार्क, वडाळा आय मॅक्स, मुंबई, मुळ रा. उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या तरूणीवर राहील अन्सारी याने वडाळा (मुंबई) येथे व नगर शहरामध्ये वारंवार अत्याचार केला होता.

तसेच राहील याच्या नातेवाईकांनी तरूणीला धमकी दिली होती. पीडित तरूणीच्या फिर्यादीवरून तरूणासह नातेवाईक मुसा अन्सारी, झेनाब अन्सारी,

रझिया अन्सारी, साहील अन्सारी (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. म्हाडा कॉलनी, भक्ती पार्क, वडाळा आय मॅक्स, मुंबई) अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे करीत आहेत. सर्व आरोपी वडाळा (मुंबई) येथे राहत असल्याची माहिती भिंगार पोलिसांना होती.

सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ, पोलीस अंमलदार डोळे, म्हस्के, महिला पोलीस अंमलदार येणारे यांच्या पथकाने मुंबई येथून आरोपी राहील अन्सारी याला अटक केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office