Ahmednagar News : देवळात दर्शन करून घरी जात असताना तरुणावर चाकुने वार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : बैलपोळा सणानिमित्त राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे आकाश बोर्डे हा तरूण त्याच्या कुटुंबासह बैलांना घेऊन देवळात दर्शनासाठी गेला होता. दर्शन करुन घरी जात असताना आकाश बोर्डे व त्याच्या नातेवाईकांना सहा जणांनी मिळून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून चाकूने वार केले.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की दिनांक १४ सप्टेंबर २०२३ रोजी राहुरी तालुक्यात सर्वत्र बैलपोळा सण साजरा होत होता. राहुरी तालूक्यातील देसवंडी येथील आकाश बोर्डे हा तरुण सायंकाळ ४ वाजेदरम्यान त्याच्या कुटुंबासह बैलांना घेऊन देसवंडी गावातील मंदिरात दर्शनासाठी गेला होता.

तो दर्शन करुन घरी जात असताना देसवंडी गावाच्या चौकात वैभव कोकाटे याने आकाश बोर्डे याला आवाज देवुन मागे बोलावले. आणि काही न बोलता त्याने व इतर आरोपींनी लाथा बुक्याने मारहाण करण्यास सुरवात केली.

त्यावेळी आकाश बोर्डे याचे नातेवाईक भांडण सोडवीण्यासाठी आले. तेव्हा त्यांनाही लाथा बुक्याने मारहाण करण्यात आली. यावेळी आरोपींनी आकाश बोर्डे याला लाकडी दांड्याने मारहाण करुन त्याच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले.

आकाश बाबासाहेब बोर्डे, रा. देसवंडी, ता. राहुरी. याच्या फिर्यादीवरून आरोपी वैभव कोकाटे, सौरभ शिरसाठ, शुभम कोकाटे, शुभम भारत पवार, कुलदिप पवार, शहाजी कलापुरे, सर्व रा. देसवंडी, ता. राहुरी या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.