पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना भोकर परिसरात गुरुवारी घडली.

केशव बाळासाहेब चव्हाण (वय २३) असे मृताचे नाव अाहे. केशव मित्राबरोबर सुनील फासाटे यांच्या वडजाई परिसरातील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता.

तीन दिवसांपासून तो वडिलांसमवेत पोहायला शिकत होता. विहिरीच्या कठड्यावरुन त्याने उडी मारली. तो पाण्याबाहेर आलाच नाही. शेतकरी मदतीसाठी धावले, पण त्याला वाचवण्यात अपयश आले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24