लग्नाचे आमिष दाखवून तरूणीचे अपहरण करत केला अत्याचार….?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून नुकतेच तिचे अपहरण करण्यात आले आहे. त्यानंतर मुलीला तालुक्याबाहेर नेऊन आई वडीलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला. ही घटना (दि.२०) जानेवारी रोजी घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटनेतील १७ वर्षे ७ महिने वय असलेली पिडीत तरुणी ही १२ वी च्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती (दि.२०) जानेवारी रोजी दुपारी ११ वाजेच्या दरम्यान कॉलेजसमोर उभी होती. तेव्हा शुभम सत्रे हा तरुण तेथे आला आणि तरुणीला म्हणाला माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण पळून जाऊन लग्न करु. आरोपी शुभम याने त्या तरुणीला मोटरसायकलवर बसवून एका परिसरातील एका हॉटेलमध्ये नेले.

त्या ठिकाणी शुभम याने पिडीत तरुणीला तीच्या आई वडीलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर त्याने पिडीत तरुणीला अहमदनगर येथे नेले. तेथून एका चारचाकी वाहनातून अहमदनगर ते बीड रस्त्यावर असलेल्या एका गावात नेऊन एका रुममध्ये ठेवले. (दि.२१) जानेवारी रोजी पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान त्या ठिकाणी आरोपी शुभम याचे चुलत आजोबा आले. त्यांना पाहून शुभम हा पळून गेला.

त्यानंतर शुभमच्या चुलत आजोबांनी पिडीत तरुणीला राहुरी येथील घरी आणून सोडले. त्यानंतर पिडीत तरुणीचे तीच्या नातेवाईकांसह राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. सदर फिर्यादीवरून शुभम राजेंद्र सत्रे (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर आरोपी तरुणाला अटक केले.