आरती कडुस ठरल्या नगर तालुक्यात सर्वात कार्यक्षम महिला सरपंच; विश्व संजीवनी फाऊंडेशनचा अहवाल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : तालुक्यातील सारोळा कासार येथील विद्यमान महिला सरपंच आरती कडूस या नगर तालुक्यात सर्वात कार्यक्षम महिला सरपंच ठरल्या आहेत.

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विश्व संजीवनी फाऊंडेशने नुकतीच कार्यक्षम महिला सरपंचांची यादी सादर केली असून यात नगर तालुक्यातून आरती कडुस यांची निवड झाली आहे. मागील पाच वर्षात गावात केलेल्या विविध विकासाची कामे आणि उपक्रमांच्या आधारे ही निवड करण्यात आली असल्याचे फाऊंडेशच्या वतीने सांगण्यात आले.

सरपंच कडूस यांनी हिंदू, लिंगायत, मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीचे काम मार्गी लावले. गावातंर्गत रस्त्यांचे काँक्रीटिकरण, भूमिगत गटारे असे अनेक मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवले. हरिनाम सप्ताह,

नवरात्रउत्सव असे अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम त्या नियोजित करत असतात. दरम्यान या निवडी विषयी बोलताना सरपंच कडूस म्हणाल्या की, प्रथमतः विश्व संजीवनी फाऊंडेशचे आभार मानते.

कारण जी काही सत्य परिस्थिती आहे ती त्यांनी त्यांच्या आवाहलातून मांडत आमचा, माझ्या सहकाऱ्यांचा आणि गावासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. मी व माझे पती रवींद्र कडूस नेहमीच गावाच्या विकासासाठी अग्रेसर असून गावाचा विकास हेच आमचे प्रथम प्राधान्य आहे.

आमच्या ग्रामसुधारण पॅनलच्या माध्यमातून हे काम आम्ही पुढे नेत आहोत. गावच्या विकासकामांत गावकऱ्यांची साथ आणि सहभाग अतिशय महत्वाचा असल्याने हा माझा नाही तर सारोळा गावच्या प्रत्येक व्यक्तीचा हा गौरव आहे.