अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- हिंदू नववर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरु होत असते. त्यामुळे युवकांनी हिंदू संस्कृतीप्रमाणे आपले आचरण ठेवले पाहिजे. ज्येष्ठांनाही त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे.
1 जानेवारी हे इंग्रजी महिन्याचे वर्ष असल्याने त्याचे स्वागत करणे ठिक आहे, परंतु त्यानिमित्त होणारा धांगडधिंगाना, दारु पिणे, डि.जे., मोकाट जोरात दुचाकी फिरवणे, बिभत्स प्रकार होत असतात; ही आपली संस्कृती नव्हे,
त्यासाठी युवकांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांच्यात नववर्षाबाबत जागृती व्हावी, यासाठीच थर्डीफस्टला रात्री 12 वा. श्रीगणेशाची आरती करुन या तरुणाईला सुबुद्धी दे अशी प्रार्थना केली असल्याचे विश्व हिंदू परिषद मठ मंदिर समिती जिल्हाप्रमुख हरिभाऊ डोळसे यांनी सांगितले.
नवीन वर्षानिमित्त श्री शिव गणपती मंदिर येथे श्रीगणेशाची आरती करण्यात आली. याप्रसंगी विश्व हिंदू परिषद मठ मंदिर समिती जिल्हाप्रमुख हरिभाऊ डोळसे, डॉ.चंद्रकांत केवळ, डॉ.ओंकार भोज, अॅड.अनिल कुल्लाळ, चेतन डोळसे, ओंकार कराळे अर्जुन परदेशी,
अप्पा खटांडे, साईराज डोळसे, निकिता डोळसे आदि उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.चंद्रकांत केवळ यांनीही भारतीय संस्कृती ही जगात महान असून, या युवकांनी या आपल्या संस्कृतीप्रमाणे आचारण करुन संस्कृती टिकविण्याचे काम करावे, असे आवाहन केले.