अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा अपुरी पडू लागली आहे.
खासगी रुग्णालयांमध्येही कोरोनावर उपचार केले जातात परंतु त्यांची अवाजवी फी सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे जनसामान्यांनी शहाणे होणे गरजेचे आहे.
या आजारापासून दूर राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. नुकतीच एक घटना शहरात घडली. शहरातील एका खाजगी रुग्णालयात एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू असताना त्याची प्रकृती खालावली.
त्याच्या प्रकृतीला आराम पडावा, यासाठी उपचार करणार्या डॉक्टरांनी या रुग्णाच्या नातेवाईकांना बोलावून त्यास अमूक अमूक इंजेक्शन्स द्यावी लागतील,
असे सुचविले व ती आणून देण्यास सांगितले. विशेष म्हणजे ही दोन इंजेक्शन काल नगर शहरातील कोणत्याही मेडीकलमध्ये नव्हती. नंतर ती नगर शहरातील एका अन्य खाजगी हॉस्पिटलमधील मेडीकलमधून विकत घेण्यात आली.
या दोन इंजेक्शनची जीएसटीसह एकूण किंमत रु. 45 हजार 945 रुपये इतकी झाली. आज आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली मंडळी खाजगी रुग्णालयात उपचार घेऊ शकतात.
खाजगी रुग्णालयातील डॉक्टरही आपल्यापरिने रुग्णास सेवा देऊन करोनाविरुद्धच्या लढाईत जिल्हा रुग्णालयातील मंडळींप्रमाणे हातभार लावत आहेत. तरीही नागरिकांनी स्वहिताची काळजी घेणे आणि प्रशासनाने सांगितलेले नियम पाळणे हेच हितावह आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com