अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे.
आता जिल्ह्यातील कोल्हार जवळील भगवतीपुर येथे एकाच दिवसात (शनिवार) ७ लोक पॉझिटिव्ह निघाले. सद्यस्थितीत भगवतीपूरमध्ये एकाच कुटुंबातील 8 व्यक्ती आणि दुसर्या कुटुंबातील 4 व आणखी 1 मिळून
एकूण 13 जण करोना संक्रमित झाले. काल शनिवारी चाचणीसाठी पाठविलेल्या 14 व्यक्तींचे अहवाल काय येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याखेरीज 9 व्यक्तींनी खाजगीरित्या नगर येथे करोना चाचणी केल्या असून त्यांचे अहवाल येणे शिल्लक आहे. येथील एका एका वस्तीवरील 99 वर्षीय वृद्ध गुरुवारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर
त्यांच्या कुटुंबातील 5 जण शुक्रवारी कोरोना बाधित आढळले. काल शनिवारी प्राप्त अहवालानुसार त्याच कुटुंबातील आणखी दोघेजण आणि त्यांना खेटून असलेल्या
शेजारच्या वस्तीवरील एकाच कुटुंबातील 4 जण त्याचबरोबर नजीक राहणारा 1 व्यक्ती असे एकूण 7 जण शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात समोर आले.
त्यामुळे वस्तीवरील ‘तो’ कंटेन्मेंट झोन एरिया आता हॉटस्पॉट बनल्याची माहिती कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप यांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews