अहमदनगर बातम्या

अबब! तब्बल दोन कोटी रुपयांची वीजचोरी ‘या’ ठिकाणी घडली घटना:दोघांवर गुन्हा दाखल

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : एकीकडे शेतकऱ्यांचे किरकोळ वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने त्यांचा वीज पुरवठा खंडित केला होता. तर दुसरीकडे कर्जत तालुक्यातील मिरजगाव भागातील छत्रपती जिनिंग व प्रोसे. प्रा. ली या कंपनीने गेली सतरा महिन्यात १ कोटी ९४ लाख ८२ हजार ८५९ रुपयांची चोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

याप्रकरणी वीज वितरण कंपनीने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी, अहमदनगर येथील वीज वितरणच्या भरारी पथकातील अति. कार्यकारी अभियंता प्रदीप राधेशाम सावंत यांनी मिरजगाव परिसरात असलेल्या छत्रपती जिनिंग व प्रोसे. प्रा. ली येथे केलेल्या

तपासणीत वीज वापराची नोंद वीज मिटरमध्ये कमी प्रमाणात होईल अशी कायमस्वरूपी व्यवस्था करुन वीजचोरी केली. ही बाब लक्षात आल्यानंतर १७ महिण्याच्या कालावधीत महावितरण कंपनीचे १११६७४३ युनिटची वीज चोरी केली असून त्याची किंमत अधिभारासह १ कोटी ९४ लाख ८२ हजार ८५९ रुपये होते.

याबाबतची फिर्याद कर्जत पोलीस स्टेशनमध्ये दिली. यावरून छत्रपती जिंनिंग ॲन्ड प्रेसिंग प्रायव्हेट लिमिटेड वीज वापरदार राहुल भरत पवार आणि दादासाहेब अण्णासाहेब बांदल यांच्या विरुद्ध गुुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office