अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : १५ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुमारे १ तास ! अहमदनगर जिल्ह्यातील रस्ता बनतोय चर्चेचा विषय

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : श्रीरामपूर- संगमनेर महाभागावरील दत्तनगर फाट्यावरल वाकडीमार्गे शिर्डी- शिंगणापूर मध्य रस्त्याची दुरवस्थश झाल्याने, प्रहार व शेतकरी संघटनेच्या वतीने ४ जानेवारीला रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.

चार वर्षापासून सतत पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन झोपलेलेच, असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी केला आहे.

अभिजीत पोटे आणि शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. श्रीरामपूर एमआयडीसीमार्गे दत्तनगर- धनगरवाडी- वाकडी ते गणेशनगर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना २८ डिसेंबर २०२३ रोजी प्रत्यक्ष भेटून प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

राहाता व श्रीरामपूरला जोडणारा हा मुख्य रस्ता असून शनिशिंगणापूर आणि शिडर्डी यांना जोडणारा सोपा व जवळचा मार्ग असल्याने भाविक या मार्गाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. श्रीरामपूर एम.आय.डी. सी.तून होणारे अवजड वाहतूक साखर कारखान्यांना लागणारा ऊसदेखील या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक केला जातो.

दोन्ही विभागांच्या लोकप्रतिनिधींना जनतेला होणाऱ्या त्रासाबद्दल काही देणे घेणे नसल्याचे समोर आले आहे. या परिसरात असणाऱ्या धनगरवाडी- वाकडी गणेशनगर या ग्रामपंचायतींनी वेळोवेळी ठराव करून दोन्ही तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना सुमारे ४ वर्षापासून पाठपुरावा करून काहीही उपयोग झालेला नाही.

फक्त १५ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुमारे १ तास कालावधी लागतो. या रस्त्याने जाताना अनेक विद्यार्थ्यांचे अपघात झाले आहेत. रोज विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी श्रीरामपूर किंवा राहाता या ठिकाणी जावे लागत असल्याने रोज होणारा त्रास तसेच या परिसरातील नागरिक या रस्त्याने सुमारे चार ते पाच वर्षापासून त्रस्त आहेत.

तीर्थक्षेत्र खंडोबा मंदिरदेखील या मार्गावर वाकडी गावात असून अनेक भाविक दर्शनाला येत असतात. या रस्त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने व तेथील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित आंदोलने करून या रस्त्याची डागडुजी करायला प्रशासनाला भाग पाडले;

परंतु आज हा रस्ता दुरुस्ती करण्यायोग्य राहिलेला नाही. पोटे यांनी माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांच्या मदतीने हा रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी पाठपुरावा केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office