अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे.
अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या या पावसाने तालुक्यातील शेतकर्यांच्या पदरी याही वर्षी निराशाच पडली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आढावा बैठकी पुरते जिल्ह्यात येणार्या व नेहमी गैरहजर पालकमंत्र्यांनी तरी लक्ष घालावे अशी मागणी ‘गणेश’चे संचालक जालिंदर निर्मळ यांनी केली आहे.
आर्द्रता युक्त व दमट हवामानामुळे फळबांगावर तेल्या रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने फळगळ होवुन मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. शेतकर्यांमधून याचे पंचनामे होऊन मदतीची मागणी होत आहे.
मात्र शेतकर्यांचे नाव घेऊन शेतकर्यांच्या हितासाठी एकत्र येऊन सरकार चालविणार्या आघाडी सरकारमधील जिल्हयातील मंत्र्यांकडून तसेच सत्ताधारी खासदाराकडून याबाबत सोयीस्कर डोळेझाक होतांना दिसत आहे असा आरोपही त्यांनी केला.
राज्यामध्ये आघाडी सरकार मध्ये सत्तेत असलेले जिल्हयातील मंत्री बाळासाहेब थोरात, तनपुरे तसेच शिवसेनेचे सत्ताधारी खा. सदाशिव लोखंडे यांनी कोरोना धक्क्यातुन बाहेर येऊन डाळींब शेतकर्यांचे झालेल्या
नुकसानीची स्वतः पहाणी करावी व शेतकर्यांना दिलासा द्यावा, सोयाबीनचे बोगस बियाणे, दुधाची भाववाढ, खते टंचाई आदी प्रश्नामध्ये लक्ष घालावे अशी मागणी निर्मळ यांनी केली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved