Ahmednagar News : मागील भांडणाच्या कारणावरून आरोपींनी दोघा पती-पत्नीला शिवीगाळ करत लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना येथे नुकतीच घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली दिपक चव्हाण यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वैशाली चव्हाण यांचे दिर अनिल रावसाहेब चव्हाण व आरोपींचे पुर्वी वाद झालेले आहेत. त्या कारणावरुन आरोपी दारु पिवून त्यांना त्रास देतात. रविवारी (दि.७) सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान वैशाली चव्हाण व त्यांचे पती दत्तनगर येथील त्यांच्या घरी असताना तेथे घरासमोर आरोपी दारू पिवून आले व शिवीगाळ करू लागले.
तेव्हा वैशाली चव्हाण व त्यांचे पती दिपक हे बाहेर आले आणि आरोपींना म्हणाले की, तुम्ही विनाकारण शिवीगाळ का करता. असे म्हणाल्याचे राग आल्याने आरोपींनी वैशाली चव्हाण व त्यांचे पती दिपक यांना शिवीगाळ करत लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दमदाटी केली.
घटनेनंतर वैशाली दिपक चव्हाण यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी आकाश बाळासाहेब मरकड व सोनु अशोक काळे तसेच पंकज नारायण शिंदे यांच्यावर शिवीगाळ, मारहाण व दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.