अहमदनगर बातम्या

बीटीआर गेटसमोर अपघात; युवकाचा मृत्यू

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : छत्रपती संभाजीनगर रोडवरील बीटीआर गेटसमोर मालट्रकने दिलेल्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला.

राहुल घुसळे हे अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या इसमाचे नाव आहे. हा अपघात शनिवारी (दि.२४) पहाटे २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

घुसळे हा नागरदेवळे (ता. नगर) येथील रहिवाशी होता. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत राहुल घुसळे याच्या चुलत भावाचा सिटी लॉनमध्ये शनिवारी (दि. २४) विवाह सोहळा होता.

शुक्रवारी (दि.२३) सायंकाळी तेथेच हळदीचा कार्यक्रमही होता. त्यासाठी राहुल घुसळे हा मोटारसायकलवर तेथे गेला.

हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तो पहाटे २ च्या सुमारास घरी जाण्यासाठी मोटारसायकलवरुन निघाला. बीटीआर गेटसमोर आला असता पाठीमागून येणाऱ्या मालट्रकने त्याच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.

धडकेत तो जखमी होवून मृत्यूमुखी पावला. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office