वाहनाच्या धडकेत दोन युवकांचा जागीच मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहाता : अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमधील एकाची ओळख पटली असून दुसऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही..

राहाता शहरातील कोपरगाव नाक्याजवळ शुक्रवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डेसे शंकर कमरू (वय २०, रा. निरोली, मध्यप्रदेश) त्याच्यासोबत असलेला साथीदार नाव माहीत नाही. या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

वाहनाने जोराची धडक दिल्याने या युवकांच्या अंगावरून टायर गेले. त्यामुळे अपघाताच्या ठिकाणी रक्ताचे थारोळे साचले होते. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना फोनद्वारे या अपघाताची माहिती दिली.

पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दोन युवकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात नेले. एका युवकाची ओळख पटली. मात्र, दुसऱ्याची ओळख पटलेली नाही.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24