Ahmednagar News : हरिश्चंद्र गडावरून येणाऱ्या जोडप्याचा अपघात सिमेंट कॉक्रीटचा मिक्सर डंपर अंगावरून गेल्याने मृत्यू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अकोले शहरातील कोल्हार-घोटी रोडवर कराळे यांच्या दुकानासमोर हरिश्चंद्र गडावरून परतणाऱ्या संगमनेर येथील पर्यटकाच्या दुचाकीचा अपघात होऊन सिमेंट कॉक्रीटचा मिक्सर डंपर अंगावरून गेल्याने तरुण हेमंत मधुकर अस्वले याचा मृत्यू झाला. तर पत्नी रानु हेमंत अस्वले हिच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक मिळालेल्या माहितीनुसार, अकोले शहरातील कोल्हार घोटी राज्यमार्ग सिमेंट कॉक्रिटचा झाला आहे. या रस्त्यावर कराळे यांच्या किराणा दुकानासमोर शनिमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत अकोले नगरपंचायतने गटार व शनिमंदिर रस्ता कॉक्रीटचा नुकताच बनवलेला आहे.

मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपंचायत दोघांनी रस्ता बनवताना निष्काळजीपणा करुन दोन्ही रस्त्याच्या जॉइंटवर मोठी खटकी पडलेली आहे.या खटकीने शहरातील अनेक महिला व पुरूष गाडी चालकाचा छोटे अपघातही झालेले आहे.

संगमनेर येथील हेमंत अस्वले, त्यांची पत्नी रानु अस्वले व एक मित्राची फॅमिली, असे हरिश्चंद्र गडावर पर्यटनासाठी गेले होते. तेथुन परतत असताना सोमवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या दरम्यान

याच ठिकाणी हेमंत अस्वले यांची मोटारसायकल याच खटकीमुळे पडल्याने दोघेही रस्त्यावर पडल्याने त्याच्या मागेच रस्त्याने जात असलेला कालव्याच्या कामाचा मिक्सर डंपर त्याच्या पायावरून गेला.

जखमींना रुग्णवाहिकेने अकोलेतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना संगमनेर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी हेमंत अस्वले यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी रानु अस्वले यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत रात्री उशिरा अकोले पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करुन सदर डंम्परवर कारवाई केली असल्याचे समजते.