Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. मागील दोन दिवसात विविध अपघाताच्या घटना समोर आलेल्या असून यात अनेकांनी आपले प्राणही गमावले आहेत.
पारनेर तालुक्यातील अपघाताच्या घटना ताजा असतानाच आता नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. या अपघातात एकाचा मृत्यू तर चार जखमी झाले आहेत.
रविवारी रात्री शिर्डीतून जाणाऱ्या नगर-मनमाड महामार्गावर विद्युत रोषणाईचे काम सुरु होते. या रोषणाईची करणाऱ्या एका तरुणाचा वाहनाने धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. प्रवीण गवांदे असे यामृत व्यक्तीचे नाव आहे.
तो अस्तगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. हा भीषण अपघात रविवारी (दि.१४) रात्री साडेदहाच्या सुमारास नगर-मनमाड मार्गावरील डी मार्ट मॉलसमोर घडला असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, रामनवमी उत्सवानिमित्त रोषणाईचे काम सुरू असताना रस्त्यावर शिर्डी नगरपरिषदेच्या विद्युत विभागाच्या क्रेन वाहनाला भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात प्रवीण गवांदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चौघे जखमी झाले आहेत.
शिर्डीत रामनवमी उत्सवासाठी सर्वत्र वीज रोषणाईचे काम सुरू आहे. नगर-मनमाड रस्त्यावर अशा प्रकारे काम सुरू होते. ते या कामात असताना हा अपघात झाला. त्यात गंवादे हे या कामात असताना अपघात झाला.
अहमदनगर जिल्ह्यात वाढते अपघातांचे प्रमाण हे चिंताजनक आहे. वाढत्या अपघातात मृतांचे प्रमाण देखील अस्वस्थ करणारे आहे. अपघातास अनियंत्रित वेग, रस्त्यांच्या दुर्दशा आदी गोष्टी कारणीभूत आहेत.