तरुणाचा अपघाती मृत्यू,शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील दीपक साहेबराव भुसाळ या तरुणाचा नुकताच अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. दीपक हा संगमनेर येथील एका खासगी फायनान्स कंपनीत नोकरी करत होता.

दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त तो नाशिकला गेला असता काम आटोपून संगमनेरकडे येत होता. परत येत असताना पहाटे ४ वाजेच्या सुमारास कऱ्हे घाटात अज्ञात वाहणाने त्याला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की यात दीपकचा मृत्यू झाला.

त्याच्यावर शोकाकूल वातावरणात उंबरी बाळापूर येथे अत्यसंस्कार करण्यात आले. दीपकच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. त्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24