अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-भिंगार परिसरात असणाऱ्या ‘स्वामी रेसिडेन्सी’ या घरावर बुधवारी सकाळी सात वाजता पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला.
एका दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी हा फौजफाटा आला. मात्र याची कुणकुण लागताच संबंधित आरोपीने आपल्या बंगल्याचे दरवाजे लावून घेतले व तो आतमध्ये बसला.
शेवटी आठ तासानंतर पोलिसांनी बंगल्याचा दरवाजा तोडून आरोपीला अटक केली. लॉरेन्सस्वामी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्वामीविरुध्द काही दिवसापूवीर् भिंगार पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान पोलीस स्वामी याला त्याच्या बंगाल्यासमोर उभा राहून बाहेर येण्याचे आवाहन करीत असताना तो घरात बसल्याबसल्या सूत्रे हलवत होता.
न्यायालयातून अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी तो प्रयत्न होता. लाऊड स्पिकवर पोलिसांनी त्याला बाहेर येण्याचे वारंवार आवाहन केले.
परंतु स्वामी घराबाहेर आला नाही. अखेर दरवाजा तोडून त्यास पोलिसांनी अटक केली. पोलीस उपाधिक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com