अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांची दरवाजे तोडून आतील इलेक्ट्रिक साहित्याची चोरी करणारे आरोपी राहुरी पोलिसांनी कडले असुन ७३०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
२८ मे रोजी देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल माधव पठारे यांच्या फिर्यादीवरून शाळेतील वर्ग खोल्यांचे कुलूप-दरवाजे तोडुन अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची फिर्यात पोलिसात दाखल करण्यात आली होती.
डिवायएसपी संदिप मिटके यांच्यामार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी हि बाब गांभीर्यपूर्वक घेऊन आरोपींच्या शोधासाठी पोलिसांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोकाॅ.प्रभाकर शिरसाठ,
पोकाॅ. गणेश फाटक,पोकाॅ.अजिनाथ पाखरे,पोकाॅ निलेश मेटकर आदि पोलिसांनी सखोल माहिती घेऊन संशयित आरोपी पिन्या विष्णू बर्डे ,तुक्या उर्फ तुकाराम अनिल पवार,
कैलास जगन्नाथ बर्डे सर्व राहणार देवळाली प्रवरा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले व चोरी गेलेला माल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे.
सदर आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे.जिल्हा परिषद शाळेत झालेल्या या चोरीचा तपास लागावा म्हणून मागणी होत होती तीनच दिवसात पोलिसांनी मुद्देमालासह आरोपींच्या मुसक्या आवळल्याने पोलिसांचे कौतुक केले जात आहे.