खून प्रकरणातील आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-पाथर्डी येथील आयुब उस्मान सय्यद यांच्या खून प्रकरणी आरोपी समद सालार सय्यद (वय 23 रा. पाथर्डी) याला जन्मठेपची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पाथर्डी शहरातील आयुब सय्यद व त्यांचा भाचा गफूर उस्मान सय्यद यांच्यात जानपिरबाबा दर्गा येथील पुजा करण्याच्या कारणावरून जुने वाद होते.

यावरून गफूर यांचे नातू समद सय्यद व शकुर सय्यद हे दोघे आयुब सय्यद व त्यांच्या पत्नीला नेहमी त्रास देत असे. 24 जुलै 2018 रोजी गफूर सय्यद, समद सय्यद, शकुर सय्यद यांनी आयुब सय्यद यांच्याशी झटापट केली.

समद याने आयुब यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार केले तर शकुर याने आयुब यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत आयुब यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी आयुब यांच्या पत्नीने पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी समद सय्यद व शकुर सय्यद यांच्याविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातु यांच्यासमोर झाली. दरम्यान न्यायालयाने सदर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24