अहमदनगर बातम्या

पुणे अपघातातील आरोपीने आ. प्राजक्त तनपुरेंच्या कुटुंबालाही दिलाय त्रास, आ. तनपुरेंच्या पत्नीने केलेल्या आरोपानंतर मोठी खळबळ

Published by
Ahmednagarlive24 Office

पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्शे कार बेदरकारपणे चालवून झालेल्या अपघाताने महाराष्ट्र हादरला. प्रसिद्ध उद्योजग विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोघांना भरधाव वेगाने पोर्शे कारने धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला व हे प्रकरण पाहता पाहता देशभर पसरले व सगळीकडे याचा निषेध सुरु झाला.

या संतापाची दखल घेत पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. एकीकडे हे प्रकरण गाजत असताना आता सोनाली तनपुरे यांनी धक्कादायक माहिती दिल्याने खळबळ उडाली आहे.

नेमके काय केलेत सोनाली तनपुरे यांनी आरोप ?
आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी ट्विट करत काही माहिती देत आरोप केलेत. त्या म्हणाल्या आहेत की पुणे पोर्शे कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपी व माझा मुलगा एकाच वर्गात शिक्षण घेत होते. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला असल्याचे व त्याची तक्रार देखील मी त्यांच्या पालकांकडे केली होती असे तनपुरे म्हणाल्या.

परंतु तक्रार करूनही योग्य तो प्रतिसाद मला मिळाला नाही व शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुलाची शाळा बदलली होती असे त्या म्हणाल्या. त्या घटनेचा वाईट परिणाम आजची माझ्या मनावर होत असल्याचं सोनाली तनपुरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तसेच त्या पुढे असेही म्हणाल्या, वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित आज घडलाच नसता.. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला असून त्यांची कुटुंबे उध्वस्त झालीयेत. त्यामुळे या कुटुंबांना न्याय मिळायला हवा असेही तनपुरे यांनी म्हटले आहे.

अल्पवयीन आरोपीच्या आजोबांचे छोटा राजनशी संबंध ?
या अपघातासंदर्भात पोलिसांना आणखी एक धागादोरा लागला असून अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड छोटा राजनशी संबंध असल्याची चर्चा आता सुरु झालीये. त्यांचे त्यांच्या भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात त्यांनी छोटा राजनची मदत घेतली होती अशी माहिती पोलिसांना समजली असल्याची माहिती मिळाली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office