अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे काही दिवसांपूर्वीच मनोरुग्ण महिलेची हत्या झाली होती. या महिलेच्या मारेकरीस गुन्हे शाखा बेलवंडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या गजाआड केले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी लता मधुकर शिंदे (वय ५४ रा. विसापूर ता. श्रीगोंदा) या मनोरुग्ण महिलेचा खून करण्यात आला होता.
बेलवंडी पोलीस व गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने ह्या गुन्ह्याचा तपास केला यामध्ये एका परप्रांतीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मुकेश मोतीलाल गुप्ता (वय २८ मुळचा उत्तरप्रदेश) सध्या रहिवासी बेलवंडी असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या महिलेची हत्या करण्यामागचे कोणतेही कारण नसताना हत्या करण्यात आली. आरोपीने गुन्हा कबुल केला आहे. मात्र हत्या मागचे कारण अद्याप समोर आले नाही.