अहमदनगर बातम्या

आचार्य श्री.कुंदनऋषीजी महाराज यांनी दिली सुजय विखे पाटलांना विजयाची निश्चिती

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नगर जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जैन समाजाचे गुरू संत श्री. कुंदनऋषीजी महाराज यांनी महायुतील भाजपाचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना विजय निश्चितीचे आशिर्वाद दिले.

यामुळे जैन समाजाचे पाठबळ विखे पाटील यांना लाभले असून त्यांच्या मताधिक्यात मोठी वाढ होणार आहे. राष्ट्रसंत आचार्य श्री.आनंदऋषीजी महाराज यांच्या ३२ व्या स्मृतीदिनानिमित्य नगर शहरात साजरा केल्या जाणाऱ्या

महोत्सवाच्या निमित्याने सुजय विखे पाटील यांनी कुंदनऋषीजी महाराज यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले होते. यावेळी कुंदनऋषीजी महाराज यांनी त्यांना आशिर्वाद देताना तुमचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.

नगर जिल्ह्यात राष्ट्रसंत आचार्य श्री.आनंदऋषीजी महाराज यांच्या ३२ व्या स्मृतीदिनानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी स्टेशन रोड ते आनंदधाम आश्रम पर्यंत शांती मार्च चे आयोजन करण्यात आले होते.

या मार्च मध्ये सुजय विखे पाटील यांनी सहभाग आपला नोंदविला. त्यानंतर त्यांनी आनंदधाम येथे कुंदनऋषीजी महाराज यांचे आशिर्वाद घेतले. तसेच या प्रसंगी आयोजित रक्तदान शिबीराला भेट देत रक्तदात्यांचे अभिनंदन केले.

आनंदधाम येथे येणाऱ्या भाविकांना शरबत वाटून सेवाकार्यात भाग घेतला. जैन समाजाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुजय विखे पाटील यांचा सत्कार करत त्यांना आचार्य श्री.आनंदऋषीजी महाराज यांचे तैलचित्र भेट देऊन येणाऱ्या निवडणुकीत जैन समाज आपल्या बरोबर असल्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी आमदार संग्राम जगाताप याच्यासह जैन समाजाचे प्रतिनिधी, हस्तीमल मनोद, अभय आगरकर, नितीन कुणकोळ वसंत लोढा, प्रेमजी बोथरा, संतोष बोरा, बाबूसेठ कवरा, निखील लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office