अहमदनगर शहरातील ६८ टवाळखोरांविरुद्ध कारवाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : शहरातील कॉलेज परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांविरुद्ध पोलिस दल चांगलेच आक्रमक झाले असून, भरोसा व निर्भया सेलच्या पथकाने ६८  टवाळखोर मुलांवर कारवाई केली आहे.

याशिवाय १५ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज तसेच रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या आवारात करण्यात आली आहे.

विना परवाना वाहन चालवणारे, ट्रिपल सिट, फॅन्सी नंबर प्लेट तसेच नाव नसतानाही फिरणाऱ्यांविरुद्ध भरोसा व निर्भया पथकाने कारवाई केली आहे. एकूण | ३ पथके तयार करण्यात आली असून,

प्रत्येक पथकात ३ महिला अंमलदार व १ पुरुष अंमलदाराचा समावेश आहे. साध्या वेशात राहून पथकाने ही कारवाई केली आहे. तसेच शाळेतील शिक्षकांशी पथकाने चर्चा करून सिसिटिव्ही कॅमेरे व विद्यार्थ्यांना ओळखपत्र सक्तीचे करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

निर्भया पथकाच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक पल्लवी उंबरहंडे-देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एस. के. शेख, बी.बी. पोकळे, के. लेंडाळ, एस. व्ही. कोळेकर, एस.टी. डिघुळे, एस.बी. औटी, ए.के. विधाते, एस. एस. ढवळे, आर. आर. ठोंबे, एम. बी. पुरी व एस. व्ही. रोहोकले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.