Ahmednagar News : येथे वेगवेगळ्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर भिक्षेकरी येत असतात. मात्र त्यातील अनेक भिक्षेकऱ्यांमुळे निरनिराळ्या समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुमारे ९० भिक्षेकऱ्यांची धरपकड करण्यात येऊन त्यांची भिक्षेकरी गृहात रवानगी करण्यात आली.
आगामी सनांच्या निमित्त शिर्डी शहरात होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला, उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे, पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगरपंचायत, साईबाबा संस्थान सुरक्षा विभाग व शिर्डी पोलिसांनी सोमवार दिनांक ८ एप्रिल रोजी केलेल्या मोठ्या कारवाईत साईभक्त भाविकांना वेठीस धरणारे,
भिक्षा मागणारे, पाठलाग करणाऱ्या सुमारे ९० स्त्री-पुरुषांना पकडण्यात आले. त्यांची सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने पोलीस स्टेशनमध्ये तपासणी केली. पोलिसांनी त्यांच्यासाठी चहा नाष्ट्याची व्यवस्था केली. न्यायालयाच्या आदेशाने महिलांची रवानगी चेंबूर येथील भिक्षेकरी गृहात तर पुरुषांची विसापूर येथे करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, पप्पु कादरी, कायदे तसेच पोलिस कर्मचारी बाबा खेडकर, गजानन गायकवाड, गणेश घुले, अन्ना दातीर, गणेश बोरसे, रक्षा निकाडे, अर्चना ठोके, प्रमिला सहाणे यांनी भाग घेतला. कारवाई होताच इतर अनेक भिक्षेकरी परागंदा झाले. साईबाबा मंदिर, शिर्डी बसस्थानक व लगतच्या परिसरात भिक्षेकरी लोकांची वाढती संख्या त्रासदायक ठरत होती.