अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्रेत्यावर मोठी कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील नान्नज व जवळा परिसरातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत एक लाख नऊ हजार ५२६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विभागीय आयुक्त पुणे विभाग प्रसाद सुर्वे, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क नगर गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क नगर निरीक्षक डी. आर ठोकळ,
दुय्यम निरीक्षक एम. एस. धोका, जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नान्नज व जवळा परिसरात नऊ जणांविरोधात धडक कारवाई करत देशी विदेशी दारू, गावठी दारू, रसायन, बीअर असा एकुण १ लाख ९ हजार ५२६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.