अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-कर्जत तालुक्यातील दुधोडी गावच्या शिवारात भीमा नदीच्या पात्रात फायबर बोटीच्या साह्याने अवैध वाळू उपसा सुरु होता.
कर्जत पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी जात कारवाई केली. कर्जत पोलिसांनी भीमा नदी पत्रात वाळू तस्करावर कारवाई. करत दोघांवर गुन्हा दाखल केला असून सहा लाखाचा ऐवज यावेळी जप्त केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे व पोलीस पथकाने दुधोडी गावचे हद्दीत भीमा नदी पत्रात जाऊन एक फायबर बोट व एक सेक्शन मशीन ( एकुण किंमत – 6,10,000/-) जप्त केले असुन
त्याचे मुळ मालक नाना गवळी, (रा कानगाव, ता दौडं.जि.पुणे) व सुपेकर (रा कुळधरण, ता कर्जत, जि.अ.नगर (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यावर कर्जत पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान कर्जत पोलीस ठाण्याच्या पदभार स्वीकारणारे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पदभार स्वीकारताच आपल्या हद्दीतील अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.