अहमदनगर बातम्या

‘तो’ इशारा देताच ‘त्या’ वाळूतस्करांवर कारवाई !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :-  प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळु उत्खनन करताना पकडलेल्या ट्रॅक्टरवर तात्काळ कारवाई करा अन्यथा महसूल मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू.

असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महसूल खात्याने त्या वाळूतस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करत तब्बल १ लाख ४३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

याबबत अधिक माहिती अशी की, येथील प्रवरा नदीपात्रात अवैध वाळु उत्खनन करताना महसूल विभागाच्या पथकाने ट्रॅक्टर पकडला होता. पकडलेला हा ट्रॅक्टर पथकाने ताब्यात घेत तो पोलिस वसाहतीत आणुन लावला होता;

मात्र काही तासातच हा ट्रॅक्टर तेथून गायब झाला आणि पुन्हा प्रवरा नदीपात्रात वाळु तस्करी करताना आढळून आला. काही नागरीकांनी याचे छायाचित्रण करत ते समाज माध्यमातुन व्हायरल केले.

ट्रॅक्टरमधुन वाळु चोरी होत असल्याचे चित्रण व्हायरल झाल्याची कुणकुण संबंधीत वाळुतस्करांना लागल्याने लगेचच हा ट्रॅक्टर पुन्हा पोलीस वसाहतीत लावला.

त्यामुळे शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी समाजमाध्यमात व्हायरल झालेल्या या व्हीडीओची माहिती प्रांताधिकारी, तहसीलदार,

नायब तहसीलदारांना पाठवत या वाळु तस्करांवर कारवाईची मागणी केली. अन्यथा महसूल मंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office