अहमदनगर बातम्या

राहुरीत विनानंबर, फॅन्सीनंबर प्लेटच्या वाहनांवर कारवाई

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शहरातील विनानंबर प्लेट तसेच फॅन्सीनंबर प्लेट असलेल्या ७६ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. राहुरी पोलिसांनी काल बुधवारी (दि. १५) या कारवाईत ४६ हजाराचा दंड आकारला आहे. भविष्यात पुन्हा दंडात्मक कारवाई होऊ नये, यासाठी नागरिकांकडून तात्काळ नंबर प्लेट बसवून घेतल्या आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागीला वर्षी सन २०२३ मध्ये एकूण ११२ मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते. त्यापैकी केवळ १२ गुन्हे अद्याप पर्यंत उघडकीस आले आहेत. तालुक्यामध्ये आजही बऱ्याच मोठ्या प्रमाणात विनानंबर प्लेट वाहने चालतात.

विनानंबर वाहनाकडून अपघात घडून वाहन निघून गेल्यास त्याचा शोध लावण्यात पोलिसांना अडचणी येतात. त्यामुळे चोरीच्या गाड्या कुणाच्या वापरात आहेत का, हे शोधून काढण्याच्या उद्देशाने व भविष्यात वाहनाकडून अपघात झाल्यास त्या वाहनाचा तात्काळ शोध लागण्याच्या हेतूने काल राहुरी पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण २५ अमंलदार व ६५ होमगार्ड मिळून एकूण सहा पथके तयार करण्यात आली आहे.

सदर सहा पथकांमार्फत राहुरी शहरातील मल्हारवाडी चौक, बारागाव नांदूर चौक, शनिशिंगणापूर फाटा, शनि मंदिर चौक, पाच नंबर नाका, पाण्याची टाकी चौक, अशा सहा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.

सदर नाकाबंदीत एकूण ७६ वाहने विनानंबर प्लेट तसेच फॅन्सीनंबर प्लेटच्या आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्या कागदपत्रांची शहानिशा करून भविष्यात त्यांच्यावर परत दंडात्मक कारवाई होऊ नये,

याकरिता त्यांच्याकडून तात्काळ नंबर प्लेट बसवून घेऊन योग्य तो दंड आकारून त्यांना सोडून देण्यात आले. तसेच चार गाड्यांचे कुठलेही कागदपत्र उपलब्ध नसल्याने सदर गाड्या चोरीच्या असल्याबाबत खात्री करून गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांतिले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे,

पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते, सुनील फुलारी, एकनाथ आव्हाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड, राहुल यादव, विकास वैराळ, जानकीराम खेमणर, शर्कु सय्यद, वाल्मीक पारधी, पोलीस नाईक रामनाथ सानप,

बाबासाहेब शेळके, विकास साळवे, पोलीस शिपाई जयदीप बडे, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सचिन ताजने, गणेश लिपने, आदिनाथ पाखरे, जालिंदर धायगुडे, प्रवीण आहीरे, रवी पवार, अमोल गायकवाड, भाऊसाहेब शिरसाठ, संतोष राठोड, रवी कांबळे, गोवर्धन कदम, अंकुश भोसले, रोहित पालवे यांनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office