दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद नगर एलसीबीची कारवाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-शहरातील नार्दन ब्रँच परिसरात रेल्वे भुयारी मार्गाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.

एक आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. अटक केलेल्या आरोपींमध्ये रियाज शेख (वय, २४), आजम शेख (वय २८), करण अनचिते (वय २२), बाबर शेख (वय ४५ सर्व रा.श्रीरामपूर), दानिश पठाण (वय २०, संगमनेर) यांचा समावेश आहे.

सराईत गुन्हेगार आजम शेख हा साथीदारांसह दोन दुचाकीवरून गोपीनाथनगर परिसरातून दरोड्याच्या तयारीने जात असल्याची माहिती कटके यांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी भुयारी रेल्वे मार्गाजवळ सापळा रचून दुचाकीवरील पाच आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची झडती घातली असता त्यांच्याकडून सुरा, कटावणी, मिरचीपूड, चार मोबाईल, दोन दुचाकी असा एक लाख ३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

अहमदनगर लाईव्ह 24