अहमदनगर बातम्या

गावठी दारू भट्टीवर कारवाई,दारू व रसायनासह एक लाख ४६ हजारांचा मुद्देमाल नष्ट

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शिर्डी पोलीस पथकाने तालुक्यातील चासनळी येथील गोदावरी नदी पात्रातील गावठी दारू भट्टीवर काल बुधवारी (दि.६) छापा टाकून दारू व रसायनासह एक लाख ४६ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला.

याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखाली या टीमने अचानक छापा टाकून गावठी दारू बनविणारी भट्टी उद्धवस्त केली.

तेथे हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू, असा एकूण एक लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला व अन्य साधन सामुग्री जप्त करून नष्ट करण्यात आली.

या घटनेत आरोपी संपत माळी, मिथुन छगन माळी, विशाल कृष्णा दळे (सर्व रा. माणकेश्वर नगर, चासनळी, ता. कोपरगाव) या तिघांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अचानक केलेल्या या कारवाईमुळे कोपरगाव तालुक्यातील अवैध धंदे तालुक्यात चालकांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, इरफान शेख, अशोक शिंदे, संदीप बोटे, दिनेश कांबळे, शाम जाधव, चालक ज्ञानेश्वर गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Ahmednagarlive24 Office