भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी खासदार सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबिर दोन दिवस चालणार आहे, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी गुरुवारी दिली. भाजप कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे

या शिबिराचे उद््घाटन आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे असतील. मार्गदर्शन करण्यासाठी दिलीप भालसिंग, श्यामराव पिंपळे, नितीन उदमले, दादाराम ढवण,

अनिल लांडगे, सुभाष गायकवाड, अमर कळमकर, अंतू वारुळे, राहुल जामदार, अमजद पठाण आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24