अहमदनगर बातम्या

कार्यकर्त्यांनी केंद्राच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचाव्यात ..!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या सर्व आघाड्या व बुथ रचनांची माहिती घेऊन प्रलंबित निवडी लवकरच जाहीर करुन आगामी निवडणुकींच्या दृष्टीने बुथ रचना मजबूत करा.

पार्टी विथ डिफरन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपामध्ये संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तीचा योग्य तो सन्मान पक्ष करत असतो. केंद्रात भाजपाचे ८ वर्षांपासून सरकार असून, विविध अभिनव योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहेत.

त्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याची जबबादारी सर्वांची असून, यामध्ये सातत्य ठेवले तर स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये आपण विजयी होऊ.

यासाठी नवीन मतदार नोंदणीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष देऊन या मतदारांची नोंदणी करुन घ्यावी. त्याचबरोबर पक्षाची ध्येय-धोरणे जनसामान्यापर्यंत पोहचवावी, असे आवाहन उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी केले.

भाजपाच्या शहर जिल्हा आढावा बैठक उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी ते बोलत होते. भाजपाचे नगरमध्ये चांगल्या पद्धतीने काम सुरु असून,

पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे मनपा पोट निवडणुकीत भाजपाचा उमेदवार विजयी झाला आहे, ही चांगली सुरुवात असून, कार्यकर्त्यांनी यापुढे आणखी जोमाने काम करावे.

पक्षाच्यावतीने राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम शहरात राबवून पक्ष वाढीचे काम सुरु आहे. आता आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करुन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असल्याचे भैय्या गंधे यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office