अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-भिंगार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या सभासद नोंदणी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
युवक शहराध्यक्ष अमित काळे यांच्या नेतृत्वाखाली भिंगारमध्ये पाचशे सभासदांची नोंदणी करुन वंचित बहुजन आघाडीचे युवक शहराध्यक्ष विशाल साबळे, अनिकेत मोहिते, शिव भोसले, संदीप ससाणे, नागेश साठे यांचासह दोनशे युवकांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला.
आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिंगार येथील इंदिरानगर परिसरात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी भगवान गौतम बुध्द, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, युवक शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक राहुल कांबळे, आय.टी. सेल संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर, धम्ममित्र दिपक अमृत,
दिपक गायकवाड, महादेव भिंगारदिवे, प्रविण वाघमारे, शफीक मोघल, संतोष सारसर, दया गजभिये, हर्षल कांबळे, लखन आढाव, गौतम कांबळे, शुभम ससाणे आदिंसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवक शहराध्यक्ष अमित काळे म्हणाले की, महाराष्ट्रात मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे.
हे अन्याय, अत्याचार थांबविण्यासाठी ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आरपीआयच्या माध्यमातून दीन-दुबळे, मागासवर्गीयांना एक प्रकारे संरक्षण देण्याचे काम केले जात आहे. आजही मागासवर्गीयांना हक्काच्या मागण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. इंदिरानगर भागात अनेक प्रश्न असून, या भागात दुर्बल घटक राहत असल्याने त्यांना न्याय देण्यास कोणताही पक्ष पुढाकार घेत नाही.
अशा दुर्बल घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आरपीआय कटिबध्द असून, या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. तसेच एकजूटीने संघटन करुन अन्यायाच्या विरोधात उभे राहण्याचे त्यांनी आवाहन केले.
आरपीआय मध्ये प्रवेश करणार्या व सभासद झालेल्या युवकांचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.