अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- एडीसीसी (जिल्हा) बँक संगमनेर शाखेतील मगरुर, भांडखोर व कामचुकार कर्मचारीस निलंबीत करुन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, एडीसीसी बँक मुख्य शाखेचे एमडी रावसाहेब वर्पे व मॅनेजर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
अन्यथा बँकेच्या मुख्य शाखे समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस अधिक्षकांनी संबंधित पोलीस अधिकारी यांना चौकशी करुन कारवाई करण्याचे निर्देश दिले. तर एडीसीसी बँकेचे एमडी वर्पे यांनी सदर कर्मचार्याची शंभर कि.मी. च्या अंतरावर मुख्यालयाच्या हद्दीत बदलीचे आदेश काढूले आहे.
मात्र चर्मकार विकास संघाने सुभाष शिंगोटे या कर्मचार्याच्या निलंबनाची मागणी लावून धरली आहे. चर्मकार विकास संघाचे जेष्ठनेते कारभारी देव्हारे दि.4 जानेवारी रोजी एडीसीसी बँकेच्या संगमनेर शाखेत गेले असताना चेक दिल्यावर चेक पास होऊन कॅशिअर असलेले सुभाष शिंगोंटे यांच्याकडे आले.
थांबलेल्या व्यक्तीला पैसे न देता शिंगोटे यांनी वेळकाढूपणा करुन त्यांना थांबवून ठेवले. बराच वेळ झाल्याने देव्हारे यांनी शिंगोंटे यांना पैसे मिळावे म्हणुन विनंती केली असता, शिंगोटे याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत त्यांना दमबाजी केली. हा प्रकार सर्व बँक कर्मचारींनी पाहिला.
मात्र कोणीही शिंगोटे याला आवरण्याची हिंमत केली नाही. सदर कर्मचार्याची बँकेत मोठी दहशत असून, तो बँकेत येणार्या महिला, ज्येष्ठ नागरिकांशी उध्दटपणे वागत असतो.
अनेकदा शिंगोंटेचा ग्राहकांना त्रास सहन करावा लागत असून, तो दारु पिऊन देखील बँकेत येत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. सदर कर्मचारी हा मगरुर, भांडखोर व कामचुकार असून, त्याचा सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे.
तातडीने या कर्मचारीवर निलंबीत करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात आली आहे.