‘ह्या’ तालुक्यात 13 कोरोना रुग्णांची भर ; शंभरीकडे वाटचाल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले  तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. 

तालुक्यात एकाच दिवसात तेरा रुग्ण आढळून आले आहे. तालुक्यातील रुग्ण संख्या शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.  ह्या १३ रुग्णामध्ये एकट्या माणिकओझर या आदिवासी खेड्यातील  नऊ रुग्ण आहेत. 

गोडेवाडी (केळी) येथील 2 तर रेडे गावातील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. गोडेवाडी येथील 40 वर्षीय पुरूष 35 वर्षीय महिला, रेडे येथील 22 वर्षीय तरुण तर माणिक ओझर येथील 58 वर्षीय, 60 वर्षिय,28 वर्षीय,22 वर्षीय महीला, 

25 वर्षीय पुरुष व 11 वर्ष,8 वर्षीय, 4 वर्षीय, 2 वर्षीय मुलगी तर  वाघापुर येथील 28 वर्षीय तरुण अशा १३ जणांचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यात रुग्णांची संंख्या 92 झाली असून ६१  रुग्ण बरे झाले आहेत.  तीन मयत तर 16 ऍक्टिव्ह पेशंट आहेत.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे
      क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24