कौतुकास्पद ! विधवा भावजयीसोबत लहान दिरानं बांधली लग्नगाठ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-अपघातात भाऊ मयत झाल्याने विधवा भावजयीशी विवाह करण्याचे ठरवलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वडाळा वडाळा बहिरोबा येथील दिराचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला .

समाज काय म्हणेल याचा विचार न करता वडाळा बहिरोबा (ता.नेवासे) येथे आज विधवा भावजयीबरोबर लहान दिराने लग्नगाठ बांधली.

वऱ्हाडी मंडळींनीही मोठ्या दिल्याने या अनोख्या विवाह सोहळ्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आणि नवदांपत्यास शुभशीर्वाद दिले. दरम्यान आपल्या मोठ्या भावाची पत्नी म्हणजे वहिनी लग्नाचे सात फेरे घेऊन घरात आली.

त्यानंतर घरात पाळणाही हलला. मात्र त्यांच्या आनंदावर विरजण पडलं. काळाने घात केला आणि त्यांचा पती म्हणजे मोठा भाऊ महेश मोटे यांचा अपघाती मृत्यु झाला.

प्रांजली असं संबंधित महिलेचं नाव असून तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र त्यांचा लहान दीर महेंद्रने पुढे येत आपल्या वहिनीशी लग्न करण्याच निर्णय घेतला.

दोघांच्या होकारानंतर घरातील सर्वांची सहमती घेऊन त्यांचा विवाह पार पडला. समाजाचा कोणताही विचार न करता त्यांनी विवाह करत समाजाला एक आदर्श घालून दिला आहे. महेंद्र आणि प्रांजली या दोघांना पाहुणेमंडळी, वऱ्हाडीमंडळींनी आशिर्वाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24