अहमदनगर बातम्या

कौतुकास्पद ! राहाता तालुक्यातील बारा गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :-  कोरोना विरुद्धच्या लढाईत लसीकरण हे एकमेव संरक्षक कवच बनले आहे. यामुळे लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. यातच जिल्ह्यात लसीकरण मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.(Vaccination complete) 

दरम्यान राहाता तालुक्यातील बारा गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच तालुक्यातील साठ गावांपैकी 46 गावांमध्ये करोनाची सक्रीय रुग्ण संख्या शुन्यावर आली असल्याने तालुकावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उर्वरीत पंधरा गावांमध्येही केवळ एक अंकी सक्रीय रुग्ण संख्या आहे. तसेच संपूर्ण तालुक्यातील सक्रीय रुग्णसंख्याही केवळ 22 वर आली आहे. राहाता तालुका करोना मुक्तिकडे वाटचाल करीत आहेत.

आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, पंचायत समिती व गावामधील स्थानिक प्रशासन यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे राहाता तालुक्यातील 46 गावांमध्ये दि. 21 डिसेंबरच्या अहवालानुसार एकही रुग्ण नाही.

तालुक्यातील बहुतांश गावांत करोनाचा प्रादूर्भाव ओसरत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एलमवाडी, तरकसवाडी, चोळकेवाडी, धनगरवाडी,

नांदुर खु, एकरूखे, हसनापुर, डोर्‍हाळे, नादुर्खी खुर्द, सावळीविहीर खुर्द, सावळीविहीर बुद्रुक, नादुर्खी खुर्द या बारा गांवामध्ये शंभर टक्के लसीकरण झाले आहे.

तालुक्यात रुग्ण संख्या नियत्रंणात असल्याचे दिलासादायक चित्र आहे. बर्‍याच कालावधीनंतर शाळाही सुरळीत सुरू झाल्या आहेत.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी करोनाचे नियम पाळण्याचे व प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचे अवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Ahmednagarlive24 Office