अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्‍यांसाठी प्रवेश प्रक्रीया सुविधा व समुपदेशन केंद्र सुरु

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या वतीने अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्‍यांसाठी प्रवेश प्रक्रीया सुविधा व समुपदेशन केंद्र सुरु करण्‍यात आले आहे.

संस्‍थेचे चेअरमन आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली सुरु करण्‍यात आलेल्‍या केंद्राच्‍या माध्‍यमातून अभियांत्रिकी शाखांमध्‍ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्‍यांसाठी प्रवेश प्रक्रीयेसाठी आवश्‍यक असणा-या कागदपत्रांसह ऑनलाईन प्रवेश घेण्‍याबाबतचे मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.

यामध्‍ये शिष्‍यवृत्‍ती तसेच ऑप्‍शन फॉर्म भरण्‍यासंदर्भातही विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले जाणार असल्‍याचे प्राचार्य डॉ.संजय गुल्‍हाने यांनी सांगितले.

विद्यार्थी आणि पालकांना सोयीचे ठरेल अशा दृष्‍टीने या केंद्राची सुरुवात करण्‍यात आली असून, लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात (प्रा.अनिल लोंढे, मो.नं.९८५०२०९६४३), आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांचे जनसंपर्क कार्यालयात (प्रा.दिप्‍ती दोशी मो.नं.८८८८५२१५७०), शिर्डी येथील जनसंपर्क कार्यालयात (प्रा.सचिन कोरडे, मो.नं.९८९०७७३४३५),

श्री.छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, राहुरी (प्रा.नितीन लोखंडे, मो.नं.९९६०४५०८५०) येथे या सुविधा केंद्राची सुरुवात करण्‍यात आली असून, अभियांत्रिकीला प्रवेश घेणा-या विद्यार्थी आणि पालकांनी या केंद्रावर संपर्क साधावा असे आवाहन संस्‍थेच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24