एरियल फोटोग्राफर बाळ जहागिरदार कालवश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- जगप्रसिद्ध एरियल फोटोग्राफर नगरचे सुपुत्र योगेंद्र उर्फ बाळ जहागिरदार यांचे आज (दि.28) अल्पशा आजाराने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते.

देशात व परदेशात रिमोट कंट्रोल विमानातून तसेच ग्लायडरमधून चित्तवेधक छायाचित्र घेण्यात त्यांचा हातखंडा होता. अतिशय चिकित्सक,

साहसी व कलाप्रेमी बाळ जहागिरदार यांनी हैद्राबाद,पुणे,नगर तसेच कश्मिर-कन्याकुमारी-ढाका असा रिमोट कंट्रोलवर जगातील सर्वात जास्त अंतर विमाने चालविण्याचा विश्‍वविक्रमी प्रयोग केला होता.

त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अनिलकुमार लखिना व छायाचित्रकार दत्ता खोरे यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले. बाळ जहागिरदार यांच्या एरियल फोटोग्राफीमुळे जगभर त्यांचे चाहते होते.

नगर जिल्हा व राज्यातील विविध संस्थेमध्येही त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. त्यांच्या जाण्याने अनेक क्षेत्रातील मान्यवर, रसिकनगरकर यांनी दु:ख व्यक्त केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24