दूध उत्पादकांची परवड हे मोदी सरकारचे पाप ;महसूलमंत्री थोरात यांची टीका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-सध्या राज्यात दूध दरवाढीचा प्रश्न चांगलाच चिघळला आहे. दुधाला प्रतिलिटर १० रु अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावे अशी मागणी सध्या आंदोलक करत आहेत.

यावर बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.’ दूध उत्पादक शेतकर्‍यांची परवड ही केंद्र सरकारचे पाप असून, भाजपला दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या नावावर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही.

भाजपने आता स्वत:विरोधात आंदोलन करून पापक्षालन करावे,’असा घणाघात त्यांनी केला आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असतानाही केंद्र सरकारने दूध भुकटी आयात करून शेतकर्‍यांचा घात केला आहे,

असा आरोप थोरात यांनी केला. गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने दूध उत्पादक शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले होते.

दूध दराच्या प्रश्‍नांवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना दिलेला प्रसाद महाराष्ट्र अजून विसरला नाही.

सध्याच्या दूध उत्पादकांच्या संकटकाळात राज्य सरकारने शेतकर्‍यांचे दूध स्वत: खरेदी करून ते भुकटीच्या रूपात साठवण्याचा निर्णय घेतला आहे असेही थोरात म्हणाले.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24