अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : २० वर्षीय तरूणीशी मोबाईलवरुन मैत्री, प्रेम आणि अत्याचार नंतर बळजबरीने धर्मांतर करुन तिच्याकडून…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शहरातील एका २० वर्षीय तरूणीशी मोबाईलवरुन मैत्री करुन प्रेम. जाळ्यात त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

तसेच पीडित तरुणीला धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी काल बुधवारी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागातील २० वर्षीय तरूणीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणुक केली. तिला व तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी देवून तिला बळजबरीने आरोपीने अत्याचार केला.

तिच्या मर्जीविरोधात शरीरसंबंध करुन फोटो व व्हिडिओ तयार केले व त्याआधारे सदर तरूणीस ब्लॅकमेल करून इंदौर येथे बोलावून बळजबरीने धर्मांतर करुन तिच्याकडून नमाज पठण केली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन सायम कुरेशी (रा. जुना पिठा, इंदौर, मध्यप्रदेश), इमरान अयुब शेख (रा. कोपरगाव), छोटू उर्फ कलिम (पूर्ण नाव माहित नाही), फय्याज (पूर्ण नाव माहित नाही, दोघे रा. कोपरगाव व इंदौर) व आणखी येथील एकासह,

अशा पाच जणांवर येथील पोलीस ठाण्यात काल बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हयातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके रवाना केल्याची माहिती तपास अधिकारी पोसई भरत दाते यांनी दिली.

Ahmednagarlive24 Office