अहमदनगर बातम्या

दिवाळीनंतर जिल्ह्यात अनेक निवडणुकांचा बार उडणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नुकतेच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीनंतर जिल्ह्यात विधान परिषद,

विविध सहकारी संस्था, नगर पालिका, नगर परिषद आणि त्यानंतर लगेच जोडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.

विधान परिषदेच्या नगरच्या जागेची मुदत 1 जानेवारीला संपत असून त्याआधी डिसेंबरमध्ये या जागेसाठी निवडणूक होणार आहे. या मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, महापालिकाचे नगरसेवक, नगर पालिका आणि नगर परिषदेचे नगरसेवक मतदार आहेत.

दरम्यान, आधीच पाच नगर पालिका आणि नगर परिषदेवर प्रशासक असून आणखी सात नगर पालिका आणि नगर परिषदेची मुदत डिसेंबरमध्ये संपणार आहे.

यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर लगेच 12 नगर पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. यासोबत ग्रामीण भागात सेवा सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने दिवाळीनंतर जिल्ह्यात निवडणुकीचा बार उडणार आहे.

Ahmednagarlive24 Office