Ahmednagar News : अतिवृष्टीमुळे अनेक भागात फुलांच्या शेतीची नासधूस झाली. तरीही यातून वाचलेली फुले सध्या गणेशोत्सव व महालक्ष्मीसाठी बाजारात विक्रीला येत आहेत. या फुलांना चांगला बाजारभाव मिळत आहे.
विघ्नहर्ताच्या पाठोपाठ आगमन होत असलेली महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरीच्या स्वागताची घराघरांत लगबग सुरू असताना सणाच्या पार्श्वभूमीवर फुलबाजारही चांगलाच बहरला.
फुलहारांच्या दरवाढीने भाविकांचा खिसा हलका होत असून विक्रेत्यांची चांगली कमाई होत आहे, तर सामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. गणपती आणि महालक्ष्मीच्या काळात फुलांच्या हारांना मोठी मागणी असते.
पावसामुळे ऐनवेळी बाजारात फुले कमी आली तर तारांबळ नको आणि गर्दी टाळण्यासाठी अनेक ग्राहकांनी फुलवाल्यांकडे आठ दिवसांपूर्वीच ऑर्डर देऊन ठेवली होती.
महालक्ष्मीसाठीचे खास हार बाजारात एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत आहे. दोन-तीन दिवस आधी ५० रुपये किलोने विकला जाणारा झेंडू ८० रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला.
विघ्नहर्ताच्या पाठोपाठ आगमन होत असलेली महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरीच्या स्वागताची घराघरांत लगबग सुरू असताना सणाच्या पार्श्वभूमीवर फुलबाजारही चांगलाच बहरला. फुलहारांच्या दरवाढीने भाविकांचा खिसा हलका होत असून विक्रेत्यांची कमाई होत आहे, तर सामान्यांना आर्थिक फटका बसत आहे.
महालक्ष्मीच्या पूजनाच्या दिवशी पाना-फुलांची आरास केली जाते. तसेच ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींच्या केसात शेवंतीची वेळी माळतात. गौरींच्या गळ्यात शोभेल असा मोठा हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पानही वाहतात.
महानैवेद्याच्या दिवशी ज्येष्ठ गौरीला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. यात भाज्या, चटण्या, कोशिंबिरी, पक्वान्न तसेच फराळाचे पदार्थ केले जातात. त्यामुळे भाज्यांसह फुलांना चांगला बाजारभाव मिळत आहे.
शहरातील बाजारात शेवंतीची टंचाई होती. मोठ्या प्रमाणात शेवंती बाजारात आल्यास मागणी वाढणार आहे. त्यासाठी ३०० ते ४०० रुपये तर निशिगंध ४०० रुपये, गुलाब फुलाचे दर ४०० रुपये प्रति किलो होतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
बाजारात फुलांची आवक चांगली आहे. आवक चांगली असली तरी मागणी वाढली असून आज शेवंतीच्या फुलांची टंचाई बाजारात होती. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीच्या आगमना निमित्ताने फुलांची मागणी अधिक असते. त्यामुळे हारांच्या दरात १० ते २० टक्के वाढ झालेली आहे.